घरोघरी गणेशाचे आगमन झाले आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वचजण गणेशाच्या भक्तीत न्हाहून निघाले आहेत. सुखकर्ता गणेशाचं स्वागत समाजातील प्रत्येक वर्ग मनापासून करतो. तृतीयपंथीय देखील यामध्ये मागे नाहीत. कल्याणजवळच्या शहाडमध्ये तृतीयपंथीय फरा यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालंय. पुढचे सात दिवस त्यांच्या घरी बाप्पाचा मुक्काम आहे.