महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. केळझर येथील गणपती मंदिर हे या अष्टविनायकांपैकी एक आहे. प्रभू रामाचे गुरू वसिष्ठ यांनी या मंदिराची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. वर्धा जिल्ह्यातील याच मंदिराच्या मागे एक प्राचीन विहीर असून तिला गणेश कुंड म्हणून ओळखलं जातं. मंदिरात येणारे भाविक या कुंडालाही आवर्जून भेट देतात.