गणरायाच्या आगमनासाठी अवघा काही अवधी शिल्लक राहिला असून साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षीची गणेश चतुर्थीही अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्याची राहणार असून या गणेश चतुर्थीला तब्बल 300 वर्षानंतर एक अद्भुत योग घडत आहे. तो म्हणजे या गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग आणि शुक्ल योग असे दोन शुभ योग तयार होत आहेत. म्हणून या अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीचा दिवस हा तीन राशींच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. या तीन राशी कोणत्या आहेत आणि या योगाने कसा फायदा होणार आहे यासंदर्भातच नागपुरातील ज्योतिषशास्त्र अभ्यासक डॉ.ज्योतिर्वेद भूषण यांनी माहिती दिली आहे.