इच्छाशक्ती असेल आणि आळस नसेल तर कोणत्याही वयात तणावरहित निरोगी जीवन जगता येणे शक्य आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे वर्ध्यातील मनोहरराव दादाजी वानखेडे होय. या आजोबांचं वय तब्बल 86 वर्ष आहे. तरी याही वयात त्यांची ऊर्जा आणि फिटनेस तरुणांना आश्चर्यात पाडणारा आहे.