सोलापूर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील हे अश्व आणि श्वान प्रेमी म्हणून प्रसिद्ध असलेले बोट रायडींग मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.सोशल मीडियावर मोहिते- पाटलांच्या राईडची चांगलीच चर्चा रंगली आहे.करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा घेतलेला अचूक वेध यामुळे मोहिते- पाटील घराण्यातील रॉयल लाईफस्टाईल असणारे धवलसिंह पुन्हा चर्चेत आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा राजकीय प्रवास करताना क्षमता असूनही राजकीय स्थिरता लाभली नसली तरी एक उमदे व्यक्तीमत्व म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र धवलसिंह मोहिते पाटील स्टाईल आयकॉन असल्याने त्यांची राईड चांगलीच फेमस झाली असून त्यामुळे अकलूज परिसरातील टुरिझमला चालना मिळेल अशी चर्चा आहे.