सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची मंडळांमध्ये गर्दी होतीय. पुण्यातल्या प्रसिद्ध गणपती मंडळांसमोर काही किलोमीटर लांब रांगा लागत आहेत. आजारपणामुळे हॉस्टिपटलमधील बेडवरुन कुठंही जाता न येणा-या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते. पण, त्यांना प्रत्यक्ष जाणं शक्य नसल्यानं हॉस्पिटलमध्ये राहून मनामध्ये गणरायाचं रुप साठवावं लागतं.