संपूर्ण क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेला गुरुवार (5 ऑक्टोबर) पासून सुरूवात होतीय. गतविजेता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात या वर्ल्ड कपची पहिली मॅच होणार आहे. भारतामध्ये 2011 नंतर पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कप होतोय. हा वर्ल्ड कप पुणेकरांसाठी देखील महत्त्वाचा आहे. कारण, पुण्यात यंदा एक किंवा दोन नाही तर तब्बल 5 मॅच होणार आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात वर्ल्ड कपच्या मॅच होत आहेत.