ख्रिस्ती बांधवांसाठी एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे नाताळ. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठा आनंदात आणि उत्साहात सर्वत्र साजरा होत असतो. कोल्हापुरातही ख्रिस्ती बांधवांकडून दरवर्षी जल्लोषात नाताळ किंवा ख्रिसमस साजरा केला जातो. त्यामुळेच यंदाच्या नाताळ सणासाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लागणाऱ्या सर्वच गोष्टी आता दुकानात उपलब्ध झाले आहेत. कोल्हापुरातील पानलाइन म्हणून ओळख असणाऱ्या पापाची तिकटी ते कोल्हापूर महानगरपालिका इमारत या रोडवर अशी अनेक दुकाने आहेत.