गणपती हे देशातील बहुसंख्य लोकांचं आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रात गणपतीची अष्टविनायक स्थानं प्रसिद्ध आहेत. तसेच विदर्भातही अष्टविनायकांचं अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचे चिंतामणी मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुरातन इतिहास असणाऱ्या या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. विशेष म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती असलेलं भारतातील हे एकमेव गणपती मंदिर असल्याचं सांगण्यात येतं.