चीनमधील 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघानं सुवर्णपदक पटकावलं. विजेत्या संघात महाराष्ट्रकन्या स्नेहल शिंदे हिनं चमकदार कामगिरी केली. 12 खेळाडूंच्या राष्ट्रीय संघात स्नेहल ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. ती मुळची पुण्यातील हिंजवडीची असून तिच्या सुवर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिचा पुणे ते चीन हा सोनेरी प्रवास आपण जाणून घेणार आहोत.