द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी आजवर अनेक क्रिकेटर घडवले आहेत. रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर ही भारतीय क्रिकेटमधली मोठी नावं. यांना घडवण्यात लाड सरांचं मोठं योगदान आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात लाड सरांचा आणखी एक शिष्य मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झालाय. भारताकडून अंडर नाईन्टिन क्रिकेट खेळलेला मुंबईकर खेळाडू अंगक्रिश रघुवंशीला कोलकाता नाईट रायडर्सनं 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलंय.N18V |