नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दुपारीच आपलं आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना मुंबईच्या बाहेर सोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, मुंबईत पोलीस विनंती करण्यासाठी राणा यांच्या घरी गेले. मात्र, नवनीत राणा यांनी फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून पोलीस आपल्याला जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी आले आहे, असा दावा केला आहे.