दिनेश, केळुसकर, रत्नागिरी, 08 मे : स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी 'नो होल्डस बँरेड' या आत्मचरित्रात आपला राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला आहे. या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. शिवसेना सोडण्यासाठी राज ठाकरे माझ्या सतत संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राणेंनी केला.