24 फेब्रुवारी : रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक राज्यन्यायमंत्री रामदास आठवले आपल्या कवितांमुळे नेहमी चर्चेत असतात. पण, आठवलेंना जेव्हा राग येतो तेव्हा काय घडतं असा प्रसंग पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषद झाली. आठवले त्यावेळी बोलत होते, पण रूमचा दरवाजा कार्यकर्त्याने नीट लावला नव्हता. सांगूनही दरवाजा नीट लावत नव्हता म्हणून आठवले थोडे चिडले.