नालासोपाऱ्यात एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून चक्क रिक्षाच्या टपावरून राजकुमार जैस्वाल यांचा मृतदेह नेण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे.नालासोपारा पाश्चिमेकडील सोमवारी ९ तारखेला राजकुमार जैस्वाल हे घरातून बाहेर पडत असताना अचानक मृत्यू झाला,त्यादिवशी इतका पाऊस झाला होता की भरपावसात मयताला माणसे,रुग्णवाहिका मिळत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी रिक्षावरून मृतदेह नेण्यात आला. पाणी इतके साचले होते की, माणसांच्या गळ्यापर्यंत पाणी आले होते,त्यामुळे शेजारी पाजारी,आप्तेष्ट सुद्धा मयताला येऊ शकले नाही, मयत होऊन २ते ३ तास झाले तरी रुग्णवाहिका मिळेना शेवटी जैस्वाल कुटुंबीयांनी रिक्षावर राजकुमार जैस्वाल 40 यांचा मृतदेह ठेवून तुळींज स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले.