अमेरिकेतल्या झीऑन नॅशनल पार्कमधल्या बर्फात अडकलेल्या एका गिर्यारोहकाला वाचवण्यात यश आलंय. गिर्यारोहणादरम्यान त्याचा पाय बर्फात खोल अडकला होता. त्याचा साथीदार तब्बल तीन तासांनंतर आपत्कालीन व्यवस्थेशी संपर्क साधू शकला. सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत होते, रात्री उशिरा हेलिकॉप्टरच्या मदतीने गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आलंय, या दोघांवर सध्या उपचार सुरु आहेत.