मुंबई, 04 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगानं त्यांच्या सभांबाबत खर्च मागवणं हे मला पटत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. आणीबाणीच्या काळानंतरच्या निवडणूक काळामध्ये अनेकांनी सभा घेतल्या मात्र त्यांच्यावर कुणीही खर्च लावलेला नाही. जर एखादा उमेदवार निवडणूक लढवत नाही तर मग निवडणूक आयोग खर्च दाखवा, असं का म्हणतात असा सवाल शरद पवारांनी विचारला.