उल्हासनगर, 07 मे : उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानं मनसेच्या विभाग अध्यक्षानं सहाय्यक आयुक्ताला अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. योगीराज देशमुख असं मनसेच्या विभाग अध्यक्षाचं नाव आहे. त्यानं सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपींना अतिशय खालच्या शब्दात शिवीगाळ केली. दरम्यान, याप्रकरणी मनसेच्या विभाग अध्यक्षावर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.