गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 26 डिसेंबर : तक्रार न घेतल्याच्या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात बाळू सुपे हे हेड कॉन्स्टेबल ड्युटीवर असताना त्यांना मारहाण करण्यात आली आहे. साहेबगौडा पाटील या इसमानं आपल्या मुलाची तक्रार का घेतली नाही म्हणून सुपे यांच्यावर हात उचलला. याप्रकरणी साहेबगौडा पाटील याला अटक करण्यात आली आहे.