नवी दिल्ली, 6 मार्च : एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मेले अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधकांकडून सरकारवर सुरू झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. ''यापुढील कारवाईच्या वेळेस विरोधकांना विमानाला बांधून न्या आणि कारवाईनंतर तिथंच मृतदेह मोजण्यासाठी सोडा असा टोला त्यांनी लगावलाय.