मुंबई, 01 मे : अखेर भारताचा सर्वात मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मसूद अझर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे.पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अझरचा हात होता. अतिरेक्यांच्या अनेक संघटनांमध्ये काश्मिरात सर्वात खतरनाक संघटना म्हणून जैश ए मोहम्मदचा बोलबाला आहे. आणि या संघटनेच्या म्होरक्यावर म्हणजे मसूद अझरवर पाकिस्तानपेक्षाही जास्त चीनचा वरदहस्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मसूद अझरला अतिरेकी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं आधीच खीळ घातली होती. अखेर आता चीनने नमतं घेतलं आहे.