प्रफुल्ल साळुंखे, सागर कुलकर्णी,मुंबई, 26 एप्रिल : राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला खरा पण आता त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाण्याची भीती काँग्रेस नेत्यांना सतावू लागली आहे. दस्तुरखुद्द पृथ्वीराज चव्हाणांनीच ही भीती बोलून दाखवली आहे. त्यामुळे विखेंच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.