प्रशांच बाग,नाशिक, 08 मे : नाशिक हा खरंतर राज ठाकरेंच्या मनसेचा बालेकिल्ला राहिला. तिथल्या महापालिकेतही मनसेनं पाच वर्षे सत्ता उपभोगली अर्थात आता तिथं भाजपची सत्ता असली तरी नाशिककरांचं राज ठाकरेंवरच प्रेम अजूनही तसंच आहे. 26 एप्रिलच्या राज ठाकरेंच्या सभेला नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नाशिकमधला मनसेचा फॅक्टर पुन्हा अॅक्टिव्ह झालाय का, अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी शेवटची सभा घेतली ती नाशिकमध्ये...