कन्हैया खंडेलवाल, हिंगोली, 08 मे : हिंगोली मतदारसंघात यावेळी खरंतर शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात रंगेल असं वाटलं होतं. पण वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाचा उमेदवार देऊन तिथली सगळी गणितंच बदलून टाकली आहे. कारण, हिंगोलीत बंजारा समाजाचं तब्बल 3 लाख मतदान आहे. अशातच वंचितचे उमेदवार मोहन राठोड यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी तीन जंगी प्रचारसभा घेतल्याने तिथल्या निकालाबाबत अंदाज बांधणं अनेकांना कठीण जाऊ लागलंय.