खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचवण्याच्या निर्धारावर ठाम आहेत. तर राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्रामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबई पोलिसांनीही कडेकोट पोलीस बंदोबस्त केला आहे.