मुंबई, 24 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच EDने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शरद पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.