सातारा, 14 जुलै : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी कोणत्या-ना-कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहतात. राजकीय विधान असो वा कोणत्याही सिनेमामधील डायलॉग असो, त्यामुळे त्यांची तरुणांमध्ये वेगळी क्रेझ पाहायला मिळते. आता उदयनराजेंचा काही दिवसांपूर्वीचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका गाण्यावर उदयनराजे बेधुंदपणे नाचताना दिसताहेत. उपस्थित लोकही उदयनराजेंच्या डान्सला चांगलाच प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओमध्ये उदयनराजे गांधी टोपी घालून 'प्यार का तोफा तेरा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांने 'टिकटॉक'वर अपलोड केला आणि तो आता चांगलाच व्हायरल झाला आहे.