<strong> शशी केवडकर, बीड,18 सप्टेंबर : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव आयोजित करण्यात आलाय. या महोत्सवात हरियाणाची सुपर डान्सर सपना चौधरीने हजेरी लावली. यावेळी तिने आपल्या नृत्याचा जलवा दाखवून बीडकरांना याडं लावलं. सपना चौधरीच्या बहारदार नृत्याने घायाळ झालेल्या बीडच्या तरुणांनी चांगलीच हुल्लडबाजी केली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.