डोंबिवली, 11 फेब्रुवारी : डोंबिवलीत गुलाब प्रदर्शनात तब्बल 350 प्रकारचे विविध जातींचे आणि आकाराचे गुलाब पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे 800 वर्ष जुना आणि चहात वापरला जाणारा चीनी गुलाब, मोदी गुलाब हेदेखील या प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवलीच्या बालभवनात हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. डॉक्टरकीचा पेशा सांभाळून गुलाबांच्या प्रेमापोटी गुलाबांची शेती आणि संशोधन करणारे डॉ. विकास म्हसकर आणि वांगणीचे मोरे बंधू यांनीही त्यांचे अनेक प्रकारचे नवीन गुलाब या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे मन प्रसन्न करणारे हे गुलाब पाहण्यासाठी डोंबिवलीकर गर्दी करतायत.