मुंबई, 23 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत विराट सभा पार पडली. यासभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसंच राज यांनी भाजपच्या आयटी सेलचीही पोलखोल केली. भाजपच्या फेसबुकवर पेजवर शेअर करण्यात आलेल्या जाहिरातीतील कुटुंबालाच राज यांनी व्यासपीठावर बोलावले होते. या जाहिरातीत 7.5 कोटी लोकांची गरिबी दूर झाल्याचा दावा केला होता.