नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांचा निषेध करत आहे. नवेली राठोड या चार वर्षाच्या मुलीने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांसाठी एक कविता सादर केली आहे. या कवितेमधून तिने भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. तसेच देशातील नेत्यांचा देखील समाचार घेतला आहे. नवेलीने सादर केलेली ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेंद्र सिंह राठोड यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडून मुलीचे नामकरण केले होते. बच्चन यांनी तिला नवेली असे नाव दिले होते. तेव्हा नवेली चर्चेत आली होती. आता या कवितेच्या माध्यमातून तिने सीमेवर लढणाऱ्या जवानांना प्रोत्साहन दिले आहे. त्याच बरोबर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना सज्जड दम देखील दिला आहे.