नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : केंद्र सरकार अधिकाराचा गैरवापर करत आहे असा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काल रात्रीपासून आंदोलन पुकारलं आहे. तर ममता यांनी छेडलेल्या आंदोलन नेमक कशासाठी? असा प्रश्न केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला आहे. ''संजय बोस, सुदिप बडोपाध्या, तापस पाल, मदन मित्रा हे तृणमुलचे मंत्री अटकेत होते तेव्हा कधी ममतांनी धरणे आंदोलन केलं नाही. पण, त्या आज त्या सर्वस्व पणाला लावून रस्त्यावर उपोषणाला बसल्या आहेत. अशी कोणती माहीत आहे CBI कडे जी उघड होऊ नये म्हणून ममतांनी हे धरणे आंदोलन सुरू केलंय?'' का घाबरल्या आहेत ममता? असा प्रश्न प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केलाय. पाहुया काय म्हणाले जावडेकर...