गणेश गायकवाड, अंबरनाथ, 2 मार्च : 16 वर्षांच्या प्राचीनं आपल्या कीर्तनातून अनेकांना भारावून टाकलं आहे. पुण्याच्या पिंप्री-चिंचवड मध्ये प्राची आठले ही 11 वीत शिकते. अवघ्या 13 व्या वरर्षीच प्राचीने कीर्तन कलेला प्रारंभ केला. आजतागायत अनेक जिल्हयांमध्ये तीचे कार्यंक्रम झाले आहेत. एवढ्या लहान वयात कीर्तनकार म्हणून तीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.