गुवाहाटी, 22 मार्च : आसामच्या गुवाहाटीमध्ये न्यूज18च्या पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. गणेशपुरीजवळ रेस्टाॅरंट 'अल्बर ईट्स'चा मालक आणि कर्मचारी यांनी मिळून अँकर आणि रिपोर्टर चक्रपाणी पराशर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पराशर यांना सिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.