नाशिक, 28 ऑगस्ट : नाशिकचे कर्तव्य कठोर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आजच अविश्वास आणला जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमार्फत हा अविश्वास ठराव आणला जातोय. स्वतः तुकाराम मुंढे यांनीही या अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची तयारी दर्शवलीय. सभागृहाचा अवमान आणि अवाजवी करवाढ केल्याच्या आरोप मुंढे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी केलाय. पाहूयात न्यूज18 लोकमतशी बोलताना काय म्हणाले तुकाराम मुंढे..