नांदेड, 09 आॅगस्ट : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. नांदेडमधील आयटीआय परिसरात चव्हाण यांच्या मालकीच्या दैनिक सत्यप्रभा वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या ठिकाणी मोठा जमाव आला. त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत चव्हाण यांच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक केली. यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. याच परिसरातील दैनिक पुढारीच्या कार्यालयावर देखील दगफफेक करण्यात आली.