पुणे, 30 जानेवारी : पुण्यात गेल्या काही दिवसापासून हत्येची सत्र सुरू आहेत. त्यातच दत्तवाडी परिसरातील एका CCTV कॅमेऱ्यात हत्या करण्यासाठी पाळणारी टोळी कैद झाली आहे. हातात कोयता घेऊन पाठलाग करणारा जमाव आणि जिवाच्या आकांताने पळणारा तरुण. कुठल्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग पुण्याच्या स्वारगेट भागातला आहे. सोमवारी संध्याकाळी पुणे - सातारा रस्त्यावर घडलेल्या या प्रसंगातील तरूण एका दुकानात घुसल्याने तो वाचला. परंतु हे दृष्य पाहणार्यांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु खुलेआम हिंसाचाराचा हा पुण्यातील एकमेव प्रसंग नाही. गेल्या 20 दिवसांत पुण्याच्या विविध भागांमध्ये मिळून 12 हत्या झाल्यात. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एकही आरोपी पोलिसांच्या गळाला लागलेला नाही.