मुंबई, 4 ऑक्टोबर: भाजपच्या चौथ्या यादीतही घाटकोपरमधून प्रकाश मेहतांना उमेदवारी न दिल्यामुळे भाजपतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. प्रकाश मेहतांना तिकीट नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उमेदवार पराग शाहांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी हल्ला केला. गाडीची तोडफोड करत सुरक्षारक्षकाला मारहाण करत मेहता समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.