मुंबई, 23 मे : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील मोठ्या मतधिक्याने विजयी झाले. कुणी सभा घेतल्यामुळे काही फरक पडतो, लोकांना कुणाला मतदान करायचं हे चांगलं माहिती आहे, असं सांगत त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. जुनी जखम भरून निघाल्याचा आनंद आहे. माझे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांचं विजयी होण्याचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. त्यामुळे हिशेब बरोबर झाला, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.