मुंबई, 23 मे : राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार मावळमधून पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थच्या पराभवावर दुख व्यक्त केलं. मावळची जागा आमच्यासाठी येणारी नव्हती. ती जागा आजपर्यंत कधीच आली नाही. तरी पार्थ तिथून लढले पण आमचे कार्यकर्ते कमी पडले, अशी खंत पवारांनी व्यक्त केली.