नवी दिल्ली, 23 मे : लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर नवी दिल्लीत भाजपने जोरदार जल्लोष केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 'दोन जागेपासून ते दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रवासात अनेक चढ उतार झाले. पण तेव्हाही नाराज झालो नव्हतो. दुसऱ्यांदाही सत्तेत आलोय तरीही हा विजय नम्रपणे स्विकारतो, आदर्शवाद सोडणार नाही', असं यावेळी मोदी म्हणाले.