VIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार!

एकीकडे मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यात दोस्ती बिल्डर्सकडून सुरू असलेलं काम, यामुळं अँटॉप हिलमधल्या लॉइड इस्टेटमध्ये भूस्खलन झालं आणि संरक्षक भिंतही कोसळली. घटनास्थळीचा जमीन खचतानाचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. कालच्या या दुर्घटनेदरम्यान अनेक वाहनं जमिनीखाली गाडली होती. तसंच लगतच्या इमारतीला तडे गेल्यामुळं रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ ओढवलीय. अशातच आज देखील भूस्खलनाची घटना सुरूच आहे. त्यामुळं नक्कीच परिसरातल्या रहिवाशांच्या पायाखालची देखील जमीन सरकली असणार.

Sonali Deshpande

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now