लखनऊ,ता. 25 जुलै : ट्राफिक जाम चा अनुभव हा काही फक्त मुंबई किंवा दिल्लीतच येत नाही. अभिनेता जॅकी श्रॉफला हा अनुभव लखनऊत आला. प्रस्थानम या चित्रपटाच्या शुटींगसाठी जॅकी दादा जुन्या लखनऊमध्ये गेला होता. जाताना तो ट्राफीक जाममध्ये फसला तेव्हा वेळ न घालवता तो स्वत:हा खाली उतरला आणि त्याने ट्रफीक कंट्रोल करत वाहनांना वाट मोकळी करून दिली. याचा व्हिडीओ जॉकीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.