नवी दिल्ली, 08 मे : काँग्रेसच्या सर्वात मोठ्या या नामदार परिवाराने देशाची आन बाण आणि शान आयएनएस विराटचा टॅक्सीप्रमाणे वापर केला होता आणि त्याचा अपमान केला होता, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. तसंच 'राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हा ते 10 दिवसांच्या सुट्टीवर होते. आयएनएस विराट त्यावेळी समुद्री सीमेवर सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आलं होतं. पण त्याला सुट्टी साजरी करण्यासाठी गांधी परिवाराला आणण्यासाठी वापरण्यात आलं, असंही मोदी म्हणाले.