नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शाहांनी न्यूज18 नेटवर्कला EXCLUSIVE मुलाखत दिली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नसून देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं भाजप अध्यक्ष अमित शाहांनी न्यूज18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मिळून घेतील असंही त्यांनी सांगितलं.