14 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील पादचारी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहे. सीएसएमटीकडून टाईम्स आॅफ इंडियाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे. संध्याकाळी ऐनगर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.