<strong>विजय राऊत (प्रतिनिधी)पालघर, 10 नोव्हेंबर: </strong> मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा इथल्या कोटुंबी नदीजवळ टँकर उलटून दुर्घटना घडली. या टँकरमधील रसायन बाहेर पडल्यानं नदीतल्या पाण्यावर मोठा फेस तयार झाला. नेमकं या टँकरमध्ये कोणतं रसायन होतं हे स्पष्ट झालेलं नाही. रसायनामुळं नदीतील अनेक मासे मेले. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.