बीड, 30 जानेवारी : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत 10 तें 15 आंबेडकर समर्थकांनी रिपाईच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची धिंड काडली. हा धक्कादायक प्रकार आंबेजोगाई शहरातील शिवाजी चौकात मंगळवारी सायंकाळी घडला. या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या रिपाई कार्यकर्त्याचं नाव महेंद्र निकाळजे (वय 45) असून, त्यांने प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट आणि VIDEO टाकले होते अशी माहिती आहे. या वरून राग मनात धरून त्याला बेदम मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आहे. अमानुष मारहाणीमुळे गंभीर जखमि झालेल्या महेंद्रवर शहरातील 'स्वराती' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भर चौकात दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकाराबाबत रात्री उशीरापर्यंत कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.