मुंबई, 27 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपनं त्यांच्याच स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं. बघाच तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी केलेले सर्व आरोप भाजपनं फेटाळून लावले. राज ठाकरेंच्या 32 प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी पण वेळेअभावी १९ प्रकरणं दाखवले, असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं. राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोललो होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवले. खोटे व्हिडिओ दाखवून भाजप जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहात, अशी टीकाही शेलार यांनी केली.