नाशिक, 2 ऑगस्ट : मराठा क्रांती मोर्चाच्या लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी सरकाच्या या वेळकाढू धोरणा विरोधात आज (गुरुवारी) बोंबाबोंब आंदोलन केलं. त्यानंतर आंदोलकांनी सामुहिक मुंडण करून सरकारचा निषेध केला. मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भात शासन दिरंगाई करत आहे. सरकाच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करीत लाखलगावच्या ग्रामस्थांनी आज बोंबाबोंब आंदोलन करून सामुहिक मुंडण करून घेतले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनक करणाऱ्या तरुणांवर सरकार तरुणांवर गुन्हे दाखल करत आहेत. मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे. त्यामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाने अशा प्रकारे तरुणांवर गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रक्रार त्वरीत थांबवावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आसा इशारा यावेळी सकल मराठा समाजाने सरकारला दिला.